कलापिनीची आगळी वेगळी चित्रपंचमी; फेस पेंटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – कला क्षेत्रात नेहमीच नवीन नवीन उपक्रम करणाऱ्या कलापिनीने यंदा फेस पेंटिंग, चेहरा रंगविणे ही संकल्पना घेऊन रंगपंचमीच्या दिवशी चित्र पंचमी साजरी केली. त्यानिमित्त आयोजित केलेल्या फेस पेंटिंग स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.

 

अशा प्रकारच्या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. निरनिराळ्या कल्पना घेऊन आलेले स्पर्धक आणि तेवढ्याच तन्मयतेने चेहरा रंगविण्यासाठी बसलेल्या व्यक्ती यांचा ताळमेळ पाहावयास मिळाला. पोलर नाईट, झाडे लावा…झाडे जगवा, वाघ वाचवा, पाणी वाचवा, लेकी वाचवा, राक्षस, मोर, सिंह, मांजर..अशा अनेक कल्पनांचे रंगाविष्कार हळूहळू चेहऱ्यावर साकारत गेले हे सगळे बघण्यातली मजा पण काही औरच होती.

 

विद्याधर दाते आणि विश्वास देशपांडे यांनी प्रत्येक स्पर्धकांशी संवाद साधून त्यांच्या संकल्पनेविषयी चर्चा केली व स्पर्धेचे परीक्षण केले. बालभवन केंद्र शाखेच्या बालांनी रंगपंचमी चित्र रंगवून साजरी केली. पाण्याचा अपव्यय टाळून मजेत साजरी झालेली कलापिनीची चित्रपंचमी सहभागी असलेल्या सर्वांनाच वेगळा आनंद देऊन गेली.

 

स्पर्धेचे यशस्वी आयोजन विराज सवाई, विशाखा बेके, ऋतिक पाटील, रामचंद्र रानडे, यांनी आणि बालभवनच्या चित्रपंचमीचे संयोजन वृषाली आपटे, मधुवंती रानडे आणि त्याच्या सहकारी प्रशिक्षिकांनी केले.

 

स्पर्धेचे निकाल –

(शालेय गट)
प्रथम क्रमांक : निशांत देवकर
द्वितीय क्रमांक : अथर्व खांदवे
तृतीय क्रमांक : तुषार सोनावणे
उत्तेजनार्थ : राहुल सोनावणे

(खुला गट)
प्रथम क्रमांक : प्रवीण सुतार
द्वितीय क्रमांक : हिमाली भोसले
तृतीय क्रमांक : मुक्ता भावसार
उत्तेजनार्थ : मानली छत्रे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.