राम स्पर्धा पार करणा-या दोन महाराष्ट्र वीरांचा इंडो सायकलिस्ट क्लबतर्फे सत्कार


एमपीसी न्यूज – जगातील सर्वात कठीण मानली जाणारी रेस अॅक्रॉस अमेरिका (राम) सायकल स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या वर्षीच्या शर्यतीचे वैशिष्ट्य आणि अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील डॉक्टर श्रीनिवास आणि डॉक्टर अमित समर्थ या दोघांनी ही स्पर्धा सोलो प्रकारात पूर्ण केल्याबद्दल इंडो सायकलिस्ट क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सत्कार समारंभ रविवार (दि. 16) रोजी सायंकाळी 4:15 वाजता काळेवाडी येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. त्यावेळी डॉ. श्रीनिवास आणि डॉ. अमित दोघेही आपला स्पर्धेचा अनुभव सांगणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे परंतु नोंदणी करणे आवश्यक आहे. http://www.meraevents.com/event/meet-raam-race-across-america-finishers-... या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल.


डॉ. श्रीनिवास यांनी 5,000 किमीची ही स्पर्धा 11 दिवस 12 तास आणि 45 मिनीटे तर डॉ. अमित यांनी 11 दिवस 21 तास आणि 11 मिनिटांमध्ये पूर्ण केली.

राम स्पर्धा पूर्ण करण्यासाठी अमेरिकाच्या 12 राज्यांमध्ये 5000 किमी आणि एकूण 1,75,000 फूट उंचीचे चढ पार करावे लागतात. ही स्पर्धा अमेरिकेच्या पश्चिमेकडील ओशनसाइड, कॅलिफोर्निया राज्यातून सुरू होते व पूर्वेकडील अॅनॅपोलिस मधील सिटी डॉक या शहरामध्ये पूर्ण होते. अमेरिकेच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करताना सिएरा, रॉकी आणि अॅपलाचियान या तीन प्रमुख पर्वतश्रेणी ओलांडून, अमेरिकाच्या चार प्रवाहातील कोलोराडो, मिसिसिपी, मिसूरी आणि ओहियो नद्या आणि ग्रेट प्लेन्स मोजे, सोनोरन वाळवंट, स्मारक व्हॅली, ग्रेट प्लेन्स आणि गेटिसबर्ग अशा अमेरिकन सीमारेषांमधून प्रवास होतो. यामध्ये स्पर्धकाला वेगवेगळ्या हवामानामध्ये; कडाक्याच्या थंडीपासून ते अत्यंत उष्ण अशा वाळवंटातून फारशी विश्रांती न घेता सलग सायकलिंग करावे लागते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.