भुशी धरणाच्या पायर्‍या पर्यटकांसाठी खुल्या

लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने मोठी वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – भुशी धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी धरणाच्या पायर्‍यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने धरणाच्या पायर्‍यांवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. आज मात्र पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पुन्हा धरणाच्या पायर्‍या पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्याने पर्यटकांनी जल्लोष केला.

मागील चार दिवसांपासून लोणावळ्यात पावसाचा जोर वाढल्याने आज रविवारच्या सुट्टी व वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने राष्ट्रीय महामार्गासह भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर आज सकाळ पासूनच मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. द्रुतगती मार्गावर देखिल अंडा पॉईंट ते अमृतांजन पूल दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पुण्याकडे येणार्‍या लेनवर संथ गतीने वाहतूक सुरू आहे.

"vahtuk

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.