जीवनाच्या यशासाठी ज्ञानाला संस्काराची जोड द्यावी – प्रा. विकास कंद

एमपीसी न्यूज – जीवन अधिक सुंदर करण्यासाठी मूल्यशिक्षण गरजेचे आहे. जीवनाला यशस्वी करण्यासाठी ज्ञान असावे लागते, केवळ ज्ञान असून चालणार नाही तर ज्ञानाला संस्काराची जोड हवी असते, असे मत व्याख्याते प्रा. विकास कंद यांनी व्यक्त केले.

निगडी येथील विद्यानंद भवन विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मूल्यशिक्षण कार्यक्रमात विकास कंद बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका छाया हब्बू, सचिन काळोखे, साहेबराव जाधव, तृप्ती हांडे आदी उपस्थित होते.

संघर्ष आयुष्यात अटळ असून देव किंवा साधू संताना देखील चुकला नाही. जेवढा मोठा संघर्ष तेवढेच मोठे यश मिळते. संघर्षाशिवाय मिळालेल्या यशाला कवडीची किंमत राहत नाही. मोबाईलच्या जगात अपण दंग झाल्याने आपल्यातील संवाद हरवला आहे. आपल्यासाठी ज्यांनी कष्ट सोसलेत त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता कमी झाल्याचे दिसत आहे. आयुष्यात कष्ट करत रहा आशावादी रहा. असेही कंद म्हणाले.

विद्यानंद भवनचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील, कार्यकारी सदस्य डॉ. डी. आर. करनुरे, डॉ. जे. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव जाधव तर आभार तृप्ती हांडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.