मावळ परिसरात 12 किलो वृक्ष बियांची ल‍ागवड

एमपीसी न्यूज- वातावरणाचा समतोल राखण्याची क्षमता ही झाडांमध्येच असल्यामुळे ‘झाडे लावा झाडे’ जगवा या मोहिमेचा एक भाग म्हणून लोणावळा व मावळ परिसरात 12 किलो झाडांच्या बियांची लागवड करण्य‍ात येणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.

शिवथरे म्हणाले, " बिबवा, रिटा, शमी, बाहवा, पृथरनजीवा या जातीचा झाडाच्या 12 किलो बिया एका सामाजिक संस्थेने दिल्या आहेत. त्या बिया रस्त्या लगतच्या मोकळ्या जागेत, डोंगरावर कोठेही ठाकल्या तरी ज्या जीव धरतात व त्याचे झाडात रुपांतर होते. या बियांचा ग्रोथ दर हा 85 टक्के आहे. सध्या मावळात सर्वत्र पावसाचा हंगाम असल्याने या बियांची लागवड केल्यास काही दिवसातच त्यांचे रुप‍ांतर झाडांमध्ये होईल. या पावसाळ्यात मी एक हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता मात्र प्रत्यक्षात दीड हजारांपेक्षा जास्त झाडांची लागवड झाली. याकरिता मला माझ्या विभागातील पोलीस ठाण्यांचे कर्मचारी, एकलव्य ग्राम सुरक्षा दल, काही शाळा व संस्था य‍ांची मदत ल‍ाभली"

प्रत्येकांने कर्तव्य समजुन वृक्ष लागवड केल्यास त्यांचे चांगले परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीला पहायला मिळतील असा आशावाद शिवथरे यांनी व्यक्त केला. वरसोली टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या बियांचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.