पीएमपीएमएल कर्मचा-यांना वैद्यकीय अंशदायी योजनेचा मिळणार लाभ

प्रस्तावाला स्थयी समितीची मंजुरी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय अंशदायी योजनेचा लाभ आता पीएमपीएमएलच्या तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला आज झालेत्या स्थयी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

2016 पासून वैद्यकीय अंशदायी योजनेचा लाभ पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना घेता येत होता. मात्र, 31 मार्च 2017 रोजी या योजनेची मुदत संपल्याने आरोग्य विभागाकडून ही सुविधा थांबविली होती. त्यामुळे हि योजना पुन्हा सुरु व्हावी यासाठी प्रशासन कडून स्थयी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात अली आहे. या योजनेसाठी महापालिका पीएमपीएमएलकडून सुमारे 6 कोटी रूपये शुल्क घेणार आहे. तसे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. 

महापालिकेच्या कर्मचाऱ्याने प्रमाणे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना देखील 90 :10 ( 90 टक्के खर्च पीएमपीचा तर 10 टक्के कर्मचाऱ्याचा) या धर्तीवर 2016-17 पासून आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. पीएमपी आणि कर्मचाऱ्यांकडून त्यासाठीचा हिस्सा जमा केला जातो. मात्र, या योजनेस केवळ 31 मार्च 2017 पर्यंतच मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय सेवा अडचणीत आली होती. त्यामुळे हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता त्याला मंजुरी मिळाल्याने आता पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची वैद्यकीय सेवा पूर्ववत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.