संभाजीनगरमध्ये ”हास्यनाद” कार्यक्रम उत्साहात


एमपीसी न्यूज – पुण्यातील नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीने संभाजीनगरमध्ये ”हास्यनाद” हा नि:शुल्क मानसे जोडणारा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या हास्य कल्बचे उद्‌घाटन नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते झाले.

यावेळी हास्य क्लबचे अध्यक्ष विठ्ठल काटे, पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षा शीला झांबरे, सुमन काटे, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या, माणसे जोडल्याने मन मोकळे होते. सगळे ताण-तणाव नष्ट होतात. जाती-पातींच्या भिंती ओलांडून माणसे जोडण्याची कला हास्य देते. स्वत: आनंदी राहत इतरांना पण आनंदी करणे यातच सुखी जीवनाचा मार्ग आहे.

या कार्यक्रमाला 100 हून अधिक सभासद उपस्थित होते. विठ्ठल काटे आणि मकरंद टिल्लू यांनी उपस्थितांतकडून हास्याचे प्रकार करवून घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.