पुणेः पीएमपीएमएलच्या चालकाची ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएमपीएमएलच्या चालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत पीएमपीएमएलचा चालक ज्येष्ठ नागरिकाला बसमधून बाहेर आणून शिवीगाळ करत गचांडी धरून मारहाण करताना दिसत आहे.

दरम्यान, हा प्रकार कधी घडला याप्रकरणी अद्याप माहिती मिळाली नसली तरी पुणे शहरातील पीएमपीएमएल बस चालक व कंडक्टर कशाप्रकारे प्रवाशांसोबत अरेरावी करत असतात ते उघड झाले आहे. नागरिकांशी अरेरावी, उद्धट वर्तन, प्रवाशांनी बसमधून उतरण्यापूर्वीच बस पुढे नेणे, अशिक्षित नागरिकांना अपमानित करणे यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. पीएमपीएमएलच्या अधिकारी व कर्मचा-यांना शिस्त लावणारे तुकाराम मुंढे अशा गुंड प्रवृत्तीच्या चालकांवर निलंबनाची कारवाई करतील का ? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.