पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव मोटार झाडांना धडकून नाल्यात कोसळली; एक ठार, तिघे जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार झाडांना धडकून नाल्यामध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात आज (बुधवारी) पहाटे तीनच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पाटण गावाजवळ घडला.

संदिपान भगवान शिंदे (वय 60, रा. बीड), असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, सुभाष साहेबराव जगताप (वय 70), किसन जठार (वय 71) आणि मुक्ताराम किसन तावरे (वय 71, सर्व रा. बीड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावरून इनोव्हा (एमएच 23 एके 3888) या मोटारीतून मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होते. पाटण गावाजळून येत असताना भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या खाली उतरून तीन झाडांना जोरात धडकली आणि नाल्यात कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.