पुणे-बँगलोर महामार्गावर अवैधरित्या गोमांस घेऊन जाणा-यास अटक


तिघांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे-बँगलोर महामार्गावर अवैधरित्या गाय व बैलाचे मांस घेऊन जाणा-या टेम्पोवर कारवाई करत पोलिसांनी त्यातील एकाला अटक केली असून तिघांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई काल (मंगळवारी) सकाळी पावणेसात वाजता करण्यात आली.

अनिल बापू मोहिते (वय 32, धंदा ड्रायव्हर रा. तुपे चाळ, वाल्हेकर वाडी, पुणे), हा आरोपी अटक असून  हुसेन मंजूर कुरेशी (रा, गवळी नगर, ता. खेड जिल्हा पुणे), तसेच रफिक पूर्ण नाव पत्ता माहित नाही धायरी पुणे हे दोघे फरार आहेत.

याप्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 23 रा, रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हुसेन कुरेशी यांच्या सांगण्यावरून 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे कापलेल्या बैलाचे व गायीचे मांस अनिल बापू मोहिते हा त्याच्या ताब्यातील टेम्पो (एमएच 14  इ टी 3532) याने कराड येथून पुण्यातील गुरुवार पेठेमध्ये रफिक याला विकण्यासाठी विना परवाना घेऊन जात होते.

याप्रकरणी विक्रेता, खरीदार तसेच वाहकाविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.