खडकीत बोर्ड लावताना उंचावरून पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – खडकीतील एका दुकानाचा बोर्ड लावत असताना उंचावरून पडल्याने एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
जगदीश लक्ष्मण पवार (वय-60), असे मयत इसमाचे नाव आहे. मयत इसम हा खडकीतील दिव्यांश मेडीकल या दुकानाचा बोर्ड लावण्यासाठी शिडीच्या सहाय्याने उंचावर गेला होता. दरम्यान, तेथे बोर्ड लावत असताना तोल गेल्याने ते जमिनीवर पडले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 
सविस्तर वृत्त थोड्याच वेळा…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.