सांगवीच्या चिमुकल्यांनीही साकारले पर्यावरणपूरक गणपती


एमपीसी न्यूज – सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी तर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींची निर्मिती विद्यार्थ्यांनी स्वतः केली. त्यातून तयार होणा-या मूर्तींची चिमुकले स्वतःच्या घरी प्रतिष्ठापणा करणार आहेत.

अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर मराठी/ इंग्लिश मीडियममध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत साडेसहाशे विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेत सुबक गणेशमूर्ती साकारल्या. या मूर्तींना नैसर्गिक रंग देण्यात येणार आहेत. या आकर्षक मूर्तीमधून एका मूर्तीची निवड करून शालेय गणेशोत्सवात तिची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी दिली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी शाळेचे चित्रकला शिक्षक कमलेश गावंड, भटू शिंदे, योगेश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.