नवलाख उंबरे येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज – नवलाख उंबरे व बधालेवस्ती येथील पहिली व दुसरीच्या 125 विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नवलाख उंबरे गावाचे सरपंच दत्तात्रय पडवळ, सी. एस. आर. समन्वयक एल ॲण्ड टी कंपनी संदीप कणसे, सी. एस. आर. प्रतिनिधी सुजाता दुर्गकर, प्रियांका जगताप यांचे हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी दत्ता शिवेकर ,विनायक बधाले ,नितिन बधाले माऊली डिंबळे, पांडुरंग दाभाडे ,अनिल बाबर, मयुर नरवडे, लक्ष्मण पापळ, महादेव बधाले, किरण जाधव, सचिन बधाले, प्रभाकर बधाले, आकाश बधाले, सुभाष मोधळे, मच्छिंद्र चोरघे, मुख्याध्यापक विजय चव्हाण, सुर्यवंशी मॅडम, गुजर मॅडम, हिरामण बधाले सर व सर्व शिक्षक व विद्यार्थीं मोठया संख्येने उपस्थित होते.

संदीप कणसे म्हणाले की, एल अँड टी कंपनी अनेक सामाजिक उपक्रम राबवते. या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिर, मोबाईल व्हॅनही कंपनीने चालु केली आहे. त्याचा फायदा आंदर मावळ मधील अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात होत आहे .कंपनी आपले उपक्रम शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याचे काम पुढील काळात करणार आहे .यामध्ये वर्ग खोल्या, खेळण्यासाठी मैदान, पाणी आडवा पाणी जिरवा यावर भर देणार आहे.

सरपंच दत्तात्रय पडवळ आपल्या भाषणात म्हणाले कि, कंपन्यांनी जर प्रत्येक गावात विकास करण्याचे ठरविले तर मावळचा विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही. कंपन्यांनी आपला सी एस आर हा गावासाठी खर्च करावा. गरजूंना मदत करावी आणि पुढील काळातही अशीच मदत करावी. शिक्षणासाठी खर्च न करता तरुण वर्गाला प्रशिक्षण दयावे व आपल्या कंपनीत रोजगार उपलब्ध करुन दयावेत. यामुळे तरुणांना इतर तालूक्यात कामासाठी जावे लागणार नाही.

या दप्तरामध्ये शाळेत लागणारे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या मुखावरून आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी सरपंच व ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापनाचे कौतुक करून आभार ही व्यक्त केले.

सुत्रसंचालन अरविंद बधाले व आभार संदीप उडाफे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.