वाहतूकीस अडथळा करणा-या हात गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – काळेवाडी फाटा ते धनगर बाबा मंदीर परिसरात भाजीविक्रेते, फेरीवाले यांचा वाहतूकीला होत असलेल्या अडथळ्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी अपना वतन संघटेचे शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे, काळेवाडी ते धनगरबाबा मंदीर या रस्त्यावर नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर बाजारपेठ असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांची गर्दी असते. याठिकाणी सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत वाहनांची वर्दळ वाढते. या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. अनेक अपघातांमध्ये काही जणांना प्राण गमवावे लागलेत.

स्थानिकांनी अनेक वेळा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. पण अतिक्रमण विभागाचे अधिकारी या हात गाड्या जप्त करुन काही रक्कम पुन्हा सोडून देतात. यामुळे हे हात गाडीवाले पुन्हा रस्त्यावर येऊन व्यवसाय करतात. वाहतुकीस अडथळा करणा-या हात गाडा मालकांवर कारवाई करण्यात यावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी, असे ही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.