‘येलघोल’ निसर्ग…शांतता आणि बरंच काही


(शर्मिला पवार)


एमपीसी न्यूज – श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येथी सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे बालकवीच्या या काव्यपंक्तीचा याची देही याची डोळा अनुभव घ्यायचा असेल तर मावळ सारखे दुसरे ठिकाण नाही. भात शेती, विशाल पसरलेला सह्याद्री अन त्याच्या कुशीत वसलेली छोटी-छोटी गाव. सगळ कसे चित्रातल्या सारखे…अशाच एका चित्रातल्या गावी म्हणजे येलघोल लेणी बघण्याचा 15 ऑगस्टच्या सुट्टी निमित्त जाण्याचा योग आला…. पुण्यापासून अवघ्या 50 किमी अंतरावरचे.

पवनामाईचे विशाल व शांत पात्राचे मनसोक्त दर्शन या प्रत्येक गावाच्या वळणावर पाहायला मिळाले. नदीकाठी, उतारावर भातशेती डोलात झुलत होती. अन त्यांच्याबरोबर गवत फूल सुद्धा…हिरव्यारंगात भडक गुलाबी, पिवळी, लाल अशी फूलं उठून दिसत होती. त्या दिवशी पाऊस नव्हता त्यामुळे निसर्गसुख मनसोक्त डोळ्यांना अनुभवता येत होते.

कामशेतपासून अवघ्या 14 ते 16 किमी अतरांवर येलघोल वसले आहे. नाव नवखं होतं पण म्हटलं जाऊन तर बघू. कामशेत कडदे करत आर्डव व नंतर येलघोल असा प्रवास, रस्ता खडकाळ व खड्यांचा होता. मात्र रस्त्यात येणारी वळण, ओढे, त्यावरील पूल, गावातील टुमदार शिखर पाहताना खड्डे जाणवेणासे झाले. त्यात गोकुळाष्टमी प्रत्येकगावात भजनाचे व दहीहंडीचे कार्यक्रम मग काय हलगी व भजनांचा आवाज त्या हिरवाईत स्वर्ग सूख देणारा होता. झेंडावंदन संपवून बच्चे कंपनी व गावकरी दहीहंडीच्या तयारीला लागले होते.

आम्ही त्यांना बघत बघत येलघोल गावात पोहोचलो. गावात सिमेंटचा रस्ता होता. गाव तसे 60 ते 70 घरांचेच पण शहरी कटकटीपासून दूर त्यामुळे शांत व सुंदर वाटले. गाड्या लेणीपर्यंत जात नाहीत. असे गावक-यांनी सांगितल्याने आम्ही गाड्या एका बंधा-याजवळ थांबवून पायी भातशेतीच्या बांधावरुन निघालो. डोळ्याला विश्वास बसणार नाही एवढी सूंदर गवत फूलं मी तिथे पाहिली. पर्यटक इकडे असून फिरकत नाहीत. त्यामुळे तिथे केवळ मोरांचा व आमचाच आवाज होता. ओढ्यावर कपडे धुणा-या बायकांना रस्ता विचारत आम्ही लेणीजवळ पोहोचलो. एक सूंदर धबधबा व एक गुहा असे या लेणीचे स्वरुप आहे. आत नाही म्हणायला चार आकृती कोरल्या आहेत. मात्र तेही अर्धवटच पण निसर्गामुळे ते अर्धवटपण जाणवलं नाही.

आम्ही मनसोक्त त्या हिरवळीवर फिरलो, उंचावरून गाव अजूनच लोभस वाटत होत. तर नजरेच्या एका कटाक्षात ढगात बुडालेला विसापूर, लोहगड व तिकोण्याचाही सुळका दिसत होता. सावलीला लपंडाव चालू होता. मोरांचा अवाज संपूर्ण परिसरात घुमत होता. कोणत्याही संगीताशिवाय सर्व पिके, गवत व झाडं एका लयीत डुलत होती. धबधब्यातून पडणारे पाणी त्याला साथ देत होते. निरव शांतता काय असते ते येथे आल्यानंतर ख-या अर्थाने अनुभवायला मिळते. 

विकास व पर्यटकांपासून दूर असणारे येलघोल निसर्गप्रेमींना नक्की आवडण्यासारखे आहे. येथे तुम्ही दुचाकी किंवा कारने जाऊ शकता. खाण्यासाठी कामशेतचाच अधार आहे. मात्र निसर्गाची भूक भागवण्यासाठी जागो-जागी हिरवळ, फुले व नदी ओढ्याचे पाणी भरपूर आहे. त्यामुळे जमल तर वाटवाकडी करून जाऊन जा ‘येलघोल’ ला…

"yelghol
"IMG
"yelghol
"yelghol
"yelghol
"yelghol
"IMG
"yelghol
"yelghol
"yelghol
"yelghol
"yelghol
"IMG
"IMG
"IMG

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.