२१ ऑगस्ट : दिनविशेष

What Happened on August 21, What happened on this day in history, August 21. See what historical events occurred, which famous people were born and who died on August 21.

२१ ऑगस्ट : दिनविशेष

२१ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

  • १८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
  • १९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
  • १९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
  • १९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

२१ ऑगस्ट– जन्म

  • १७६५: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १८३७)
  • १८७१: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)
  • १७८९: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १८५७)
  • १९०५: भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९८१)
  • १९०७: भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९६५)
  • १९०९: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २०००)
  • १९१०: जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)
  • १९२४: गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००१)
  • १९३४: महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००१)
  • १९३९: बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष फेस्टस मोगे यांचा जन्म.
  • १९६१: भारताचा फिरकी गोलंदाज व्ही. बी. चन्द्रशेखर यांचा जन्म.
  • १९६३: मोरोक्कोचा राजा मोहम्मद (सहावा) यांचा जन्म.
  • १९७३: गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म.
  • १९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस यांचा जन्म.
  • १९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक टायलर विंकलेवॉस यांचा जन्म.
  • १९८६: जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म.

२१ ऑगस्ट– मृत्यू

  • १९३१: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)
  • १९४०: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)
  • १९४७: बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८८१)
  • १९७६: प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८९९)
  • १९७७: एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकरसी यांचे निधन.
  • १९७८: भारतीय क्रिकेट खेळाडू विनू मांकड याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१७)
  • १९८१: गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन. (जन्म: १ डिसेंबर १८८५ – सातारा, महाराष्ट्र)
  • १९९१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १९१४)
  • १९९५: नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९१०)
  • २०००: समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन.
  • २०००: स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचे निधन.
  • २००१: मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
  • २००१: मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचे निधन.
  • २००४: भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१६)
  • २००६: भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिला खाँ यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९१६)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.