२२ ऑगस्ट : दिनविशेष

What Happened on August 22, What happened on this day in history, August 22. See what historical events occurred, which famous people were born and who died on August 22.

२२ ऑगस्ट : दिनविशेष – मद्रास दिन

२२ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

  • १६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.
  • १८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
  • १९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.
  • १९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
  • १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
  • १९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

२२ ऑगस्ट– जन्म

  • १६४७: प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७१३)
  • १८४८: शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९२९)
  • १८९३: अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म.
  • १९०४: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
  • १९१५: बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९९७)
  • १९१५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २००७)
  • १९१९: हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९४)
  • १९१८: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै २००४)
  • १९२०: हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म.
  • १९३५: कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)
  • १९५५: अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म.
  • १९६४: स्वीडीश टेनिस खेळाडू मॅट्स विलँडर यांचा जन्म.

२२ ऑगस्ट– मृत्यू

  • १३५०: फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा) यांचे निधन.
  • १६०७: लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन.
  • १८१८: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १७३२)
  • १९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९०३)
  • १९७८: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)
  • १९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)
  • १९८०: मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९९)
  • १९८२: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)
  • १९८९: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९३)
  • १९९५: संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक पं. रामप्रसाद शर्मा यांचे निधन.
  • १९९९: मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन.
  • २०१४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.