रोटरी क्लबच्या आरोग्य शिबिरात 50 बालरुग्णांची तपासणी

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी ,सूर्या मदर अॅण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटल आणि महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत बालरोग चिकित्सा व निदान शिबिरात 50 बालरुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

पिंपरीतील, जिजामाता रुग्णालयात आज (रविवारी) झालेल्या शिबिराचे उद्‌घाटन पुणे जिल्हा रोटरी 3131 प्रांतपाल प्रशांत देशमुख यांच्या हस्ते झाले. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष चिंतामणी अभ्यंकर, सचिव रवींद्र भावे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष विलास काळोखे, सचिव नितीन शहा, प्रकल्प प्रमुख प्रदीप वाल्हेकर, बाळकृष्ण उ-हे, जसविंदर सिंग, दिलीप पारेख, दादासाहेब उ-हे, संजय मेहता, बाळासाहेब रिकामे, सुरेश शेंडे, डॉ. राजेंद्र भोसले, स्वाती अभ्यंकर, आनंद सुर्यवंशी आदी उपस्थित होते.  

डॉ. दिलीप एकसंभे, डॉ. कपिल जाधव, डॉ. तन्मय बाहेती यांनी मुलांची तपासणी केली. यामध्ये जन्मतः हृदयविकार, संधीवाताचा हृदयविकार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, जन्मतः मधुमेह, मूत्र विसर्जनाचे आजार याबरोबर पक्षाघात, कुपोषण, हर्निया, ब्लॉन्ट्‌स आजार, अतिरिक्त बोट, पाय बाहेरील बाजूस वाकणे, ओठांमधील टाळूतील फट आदी आजारांची तपासणी करण्यात आली.

शिबिरात 50 बाल रुग्णांची तपासणी करण्यात आली. रुग्णांचे पुढील उपचार रोटरी क्लब व सुर्या हॉस्पिटल यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रंसचालन सारंग माताडे यांनी केले. तर, प्रदीप वाल्हेकर यांनी आभार मानले. बाळकृष्ण उ-हे, राम भोसले यांनी संजोयन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.