Vadgaon Maval : राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्षपदी अफताब सय्यद

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक कार्यकर्ते अफताब सय्यद यांची तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक सेल गफ्फार मलिक, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक सेल सोहेल खान, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, जि.प. सदस्य बाबुराव वायकर, युवक तालुकाध्यक्ष सुनील दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे, माजी नगरसेवक आयुब सिकीलकर, पुणे जिल्हा रा यु सरचिटणीस विशाल वहिले यांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली. आफताब सय्यद यांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले.

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सय्यद यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.