Chikhali : शटर उचकटून दुकानातील साहित्य लांबवले

एमपीसी न्यूज – शटर उचकटून चोरटयांनी दुकानातील 74 हजारांचे साहित्य लांबवले. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी साडेनऊच्या सुमारास चिखली परिसरात उघडकीस आली.

सचिन नारायण घोरपडे (वय 40, रा. स्पाईन रोड, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घोरपडे यांचे ‘अंजली टी प्रिसिजन’ या नावाने वर्कशॉप आहे. चोरटयांनी बुधवारी (दि. 5) रात्री शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 74 हजार रुपये किमतीचे ‘शाप्ट मटेरियल’ चोरून नेले. बुधवारी सकाळी फिर्यादी घोरपडे दुकानात आले असता ही घटना उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.