Bhosari : पत्र्याचे शेड तोडून जनरेटर चोरीला

एमपीसी न्यूज – कडी कोयंडा तोडून चोरटयांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला जनरेटर आणि स्टिल कटिंग मशीन चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी नऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी परिसरात उघडकीस आली.

नंदकिशोर रामसागर रॉय (वय 46, रा. संतनगर, लोहगाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रॉय हे ‘मथराणी कन्ट्रक्शन’मध्ये सुपरवायजर म्हणून काम पाहतात. त्यांच्या कंपनीकडे थरमॅक्स चौक ते केएसबी चौक असा रस्ता बनविण्याचे कंत्राट आहे. मंगळवारी (दि. 4) सायंकाळी काम उरकल्यानंतर रॉय यांनी जनरटेर आणि स्टिल कटिंग मशीन पत्राशेडमध्ये ठेवली. दरम्यान, रात्री चोरटयांनी शेडला लावलेले कुलूप आणि साखळी तोडून जनरटेर आणि स्टील कटिंग मशीन असा एकूण 18 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी सकाळी घटना उघडकीस आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.