Sangvi : पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे स्मशान भूमीच्या कामाची महापौर राहुल जाधव आणि नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पाहणी केली. स्मशानभूमीची मागील बाजूची भिंत आणि कमानीचे काम व इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.

पिंपळे सौदागर येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी महापालिकेने 16 सप्टेंबर 2011 रोजी मंजुरी दिली आहे. त्यानंतर 3 जानेवारी 2012 रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. या स्मशानभूमीच्या कामात अँम्फीथीएटर, दशक्रिया विधी हॉल ,पिंडदान व्यवस्था, 80 मीटर लांब व 8 मीटर रुंद घाट, स्वच्छता गृह, पार्किंग, सुरक्षा रक्षक रूम, कंपाउंड वॉल, गेट, कमान आदी कामांचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी विद्युत दाहिनी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा देखील आरक्षित ठेवली आहे.

यावेळी ड क्षेत्रिय अधिकारी खरोटे, कार्यकारी अभियंता गट्टूवार, उप अभियंता सुनिल पाटील, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, प्रशासन अधिकारी बहुरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बेंडाळे, गायकवाड, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.