BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : राम मराठे स्मृती राज्यस्तरीय संगीत स्पर्धेची अंतिम फेरी तळेगाव येथे

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- श्रीरंग कलानिकेतनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीतभूषण कै. पं. राम मराठे स्मृती राज्यस्तरीय संगीत स्पर्धा 2019 ची अंतिम फेरी तळेगावात हेरिटेज आर्ट अँड म्युझिक अकादमी येथे शनिवार दि. 12 आणि रविवार दि. 13 जानेवारी रोजी होणार आहे.

श्रीरंग कलानिकेतन, तळेगांव दाभाडे तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीतभूषण कै. पं. राम मराठे स्मृती राज्य स्तरीय संगीत स्पर्धा 2019 ची अंतिम फेरी शनिवार दिनांक 12 आणि रविवार 13 जाने. 2019 रोजी हेरिटेज आर्ट अँड म्युझिक अकादमी ,एक्झरबीआ स्मार्ट सिटी,तळेगाव एम.आय.डी.सी. रोड,आंबी तालुका मावळ,पुणे आयोजित करण्यात आली आहे.

यावर्षी प्रथमच प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली व संपूर्ण महाराष्ट्रातून 201 स्पर्धकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली आहे
ही स्पर्धा शनिवारी (दि. 12)आणि रविवारी (दि. 13) दोन्ही दिवस सकाळी 9 पासून सुरु होणार आहेत. या स्पर्धेमध्ये शास्त्रीय कंठ गायन, सुगमसंगीत गायन, नाट्यगीत गायन तसेच तबला-पखवाज संवादिनी, वादन असे विविध प्रकार असून विविध वयोगटामध्ये ही स्पर्धा होणार आहे.

पुणे, नांदेड, कोल्हापूर,पिंपरी-चिंचवड, माजलगाव, रत्नागिरी, औरंगाबाद, बोरीवली, ठाणे, तळेगाव या ठिकाणच्या विजेत्या कलाकारांचे गायन, वादन ऐकण्याची संधी तळेगावकर रसिकांना मिळणार आहे तरी सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन तृप्त व्हावे असे आवाहन श्रीरंग कलानिकेतन अध्यक्षा डॉ.नेहा कुलकर्णी यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी डॉ. नेहा कुलकर्णी – 9822679044, विनय कशेळकर-  7507487784 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.