Chinchwad : किरकोळ कारणाहून सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – धक्का लागल्याचा जाब विचारल्याने तिघांनी मिळून एकास सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 19) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चिंचवड येथे घडली.

भीमराव दीपक सरकटे (वय 20, रा. बलदेवनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बगिरा, करण्या उर्फ किरण आणि नन्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरकटे चिंचवड येथील प्रीमियम प्लाझा समोरून दुचाकीवर जात असताना समोरून आलेल्या आरोपींचा त्यांना धक्का लागला. याबाबत सरकटे यांनी जाब विचारला असताना आरोपींनी त्यांचा खून करण्याची धमकी देत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच एकाने रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू सरकटे यांच्या डोक्यात मारला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.