Akurdi : देशाला शुद्ध करण्यासाठी मोदी सरकार सत्तेवर येणे गरजेचे – डॉ. सुब्रमण्यम स्वामी

एमपीसी न्यूज – काँग्रेसने 70 वर्षे केलेल्या भ्रष्टाचारामुळे देश अशुध्द केला. भ्रष्टाचाराने अशुध्द झालेल्या देशाला शुद्ध करण्यासाठी 5 वर्षे पुरेसे नाहीत. यासाठी मोदी सरकारला सत्तेवर येणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असा सल्ला भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला.

भाजप दक्षिण भारतीय आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. भाजप दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला महापौर राहुल जाधव, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर आदी उपस्थित होते.

डॉ स्वामी पुढे म्हणाले, ” नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, शशी थरूर, मोतीलाल होरा, सॅम पित्रोडा हे दिग्गज नेते सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या रांगेत लवकरच प्रियांका गांधी बसतील. देशाच्या इतिहासात मोदींच्या काळात प्रथमच सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानवर हल्ला केला. यावर राहुल गांधी पुरावे मागत आहे. जेव्हा अमेरिकेने लादेनला मारले. तेव्हा राहुल गांधी यांनी अमेरिकेला पुरावे का मागितले नाही?”असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या बैठकीबाबतीत माहिती देताना राजेश पिल्ले म्हणाले, “या बैठकीला भाजप दक्षिण आघाडीचे राज्यभरातील 32 जिल्ह्यातील अध्यक्ष व पदाधिकारी सहभागी झाले होते. तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, पॉण्डेचेरी या 6 राज्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते. यामुळे भाजपला आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच फायदा होणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.