Thergaon : बांधकामांचा राडारोडा टाकणा-या तीन जणांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-यांविरोधात कारवाई सुरू आहे. थेरगाव येथे मोकळ्या भूखंडावर बांधकामाचा राडारोडा टाकणा-या तीन जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अस्वच्छता पसरविणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याअंतर्गत महापालिकेचे भरारी पथक दंडात्मक कारवाई करीत आहे. आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक आर. एम. बेद, एस. बी. पुजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत थेरगावात तिघांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या 12 जणांकडून 9 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात अस्वच्छता पसरविणा-यांवर क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील आरोग्य विभागामार्फत कारवाई केली जात आहे. महापालिकेकडून वारंवार आवाहन करुनही शहराच्या विद्रुपीकरणात काही नागरिक भर घालीत आहे. असे नागरिक आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे, असे महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.