Akurdi : आकुर्डीत आजपासून श्रामणेर शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – बुद्धपौर्णिमेनिमित्त आकुर्डी प्राधिकरणातील तक्षशिला बुद्धविहारात उद्यापासून (दि.17) श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी श्रामणेर असोसिएशन, पुणे यांच्या विद्यमाने तसेच आकुर्डी प्राधिकरणातील तक्षशिला मित्र संघाच्या वतीने हे शिबर आयोजित करण्यात आली आहे. 17 ते 31 मे या कालावधीत हे निवासी शिबिर होणार आहे.

या शिबिरात बौद्ध धम्मातील पूजा व इतर बाबींची माहिती दिली जाणार आहे. पंचशील ध्वजारोहणाने या शिबिराचे उद्‌घाटन होईल. दैनंदिन कार्यक्रमांतर्गत धम्मवंदना व मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी तक्षशिला मित्र संघाचे अध्यक्ष प्रताप सोनवणे यांच्याशी 9850585607 तसेच माजी श्रामणेर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश नाईक यांच्याशी 8788083997 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.