Maval : उज्वला गॅस योजनेंतर्गत रवींद्र भेगडे यांच्या वतीने 531 कुटुंबांना मोफत गॅस वाटप

एमपीसी न्यूज –  मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोमवारी (दि.९) सकाळी ११ वा. कामशेत (ता. मावळ) येथील गणेश मंगल कार्यालय मावळ प्रबोधिनी संस्थेच्या वतीने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत ५३१ कुटुंबांना मोफत गॅस वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ५३१ कुटुंबांना या मोफत गॅसचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रशांत ढोरे, सूर्यकांत वाघमारे, भास्कर म्हाळस्कर, नगरसेवक अमोल शेटे, अमोल शेटे, निवृत्ती शेटे, माऊली शिंदे, शंकरराव शेलार, शंकरराव शिंदे, शिवाजी टाकवे, सुवर्णा संतोष कुंभार, शांताराम काजळे, शांताराम कदम, काळूराम भोईरकर, राजू खांडभोर, आदी मान्यवर उपस्थित होते.

वाड्या – वस्त्यांवर राहणाऱ्या महिलांना आजही चूल पेटवण्यासाठी अनेक मैल चालत जाऊन लाकूडतोड करावी लागत आहे. या योजनेमुळे महिलांचे जीवन सुखकर होईल व ग्रामीण भागातील जीवनमान देखील उंचावेल, असे भाष्य देखील श्रीरंग बारणे यांनी केले. रवींद्र भेगडे गेली अनेक वर्ष मावळ तालुक्याच्या जनतेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे. आजपर्यंत ५०,००० पेक्षा अधिक नागरिकांनी त्यांच्या माध्यमातून लाभ घेतलेला आहे आणि हे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. शासनाच्या प्रत्येक योजनेचा व उपक्रमाचा लाभ सर्व नागरिकांना सहज व सोप्या पद्धतीने घेता यावा यासाठी मावळ प्रबोधिनी संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत आहे.

यापुढील काळात देखील अशाच पद्धतीने कार्यशील असेल, असे आश्वासन यावेळी मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष व भाजयुमो मावळ तालुक्याचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी दिले. यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, सूर्यकांत वाघमारे, भास्कर म्हाळसकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.