Chikhali : रुग्णवाहिका चालकाने वाढदिवसाचा खर्च वाचवून केले 1000 ‘मास्क’चे वाटप

एमपीसी न्यूज – वायसीएम रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या चिखली येथील चालकाने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाढदिवसानिमित्त 1000 मास्कचे वाटप केले आहे.

मारुती जाधव असे या चालकाचे नाव आहे. आज (शनिवारी) त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे वाटप करण्यात आले. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च न करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विविध परिसरातील गरजू नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मास्कचे मोफत वाटप केले. यामध्ये वायसीएम रुग्णालय, संभाजी नगर, चिखली, घरकुल, चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी, पोलीस मित्र व वृद्ध नागरिकांना स्वसरंक्षणासाठी मास्क चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मारुती जाधव, कीर्ती जाधव, विशाल गरड, अविनाश काळे, प्रसाद ढमढेरे, पिंपरी पोलीस स्टेशनचे गुन्हे विभागाचे राजेंद्र निकाळजे आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे त्यामुळे वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून मी मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतला, असे मत मारुती जाधव यांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.