Pune : कोरोनाचा हॉटस्पॉट कमी करण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना रुग्ण संख्या कमी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भवानी पेठ आणि ढोले पाटील रस्ता येथील कोरोनाचा हॉटस्पॉट कमी करण्याची जबाबदारी साखर आयुक्त सौरभ राव यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात भवानी पेठ आणि ढोले पाटील रस्ता या भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे शिवधनुष्य राव यांना पेलावे लागणार आहे.

यापूर्वी राव पुणे जिल्हाधिकारी असताना त्यांनी माळीण दुर्घटनेनंतर उध्दभवलेली परिस्थिती पध्दशिरपणे हाताळली होती. शिवाय त्यांनी पुणे महापालिका आयुक्त म्हणूनही चागंले काम केले आहे. आज घडीला भवानी पेठेत सर्वाधिक म्हणजेच 391 कोरोनाचे रुग्ण आहेत. दिवसेंदिवस या भागात रुग्ण वाढतेच आहे. तर, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यलया अंतर्गत 290 रुग्ण आहेत. त्यामुळे हा परिसर कोरोनमुक्त करण्याचे आव्हान राव यांच्यासमोर आहे.

तसेच कोरोनाचे रुग्ण वाढत असलेल्या कसबा – विश्रामबागवाडा, कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे, तर पशुसंवर्धन आयुक्त सचिनदर प्रतापसिंग यांच्याकडे शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय, तर येरवडा – कळस – धानोरी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी भूजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसे स्पष्ट आदेशच महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चार अधिकाऱ्यांची पुण्यातील कोरोना संकट कमी करण्यासाठी नियुक्ती केली आहे. या सर्व क्षेत्रीय कार्यालयात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहे. दाटीवाटीने या भागांत नागरिकांचे वास्तव्य आहे. या भागांतील कोरोना आटोक्यात आणणे या अधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.