Dehuroad Corona Update : दिलासादायक ! कॅन्टोन्मेंट हद्दीत आज फक्त एका रुग्णाची नोंद

80 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एमपीसीन्यूज : गेल्या काही दिवसांपासून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच हद्दीतील संकल्पनगरी येथे आज एका पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामुळे देहूरोडच्या जनतेला दिलासा मिळाला आहे.

आजपर्यंत हद्दीत एकूण 842 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत अवघ्या एका नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 842 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर एकूण 681 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

यापैकी सध्या 25 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 31 रुग्णांवर , हिंजवडी येथील विप्रो कोविड केअर सेंटर येथे एक आणि देहूगावातील कोविड केअर सेंटर येथे दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

80 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 22 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87e049459cec22e5',t:'MTcxNDczOTY3OC41MDUwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();