Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 18 रुग्णांना डिस्चार्ज; 8 नवे पॉझिटिव्ह रुग्ण
एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, मंगळवारी सिद्धिविनायक नगरी येथे 3, मेहता पार्क आणि संकल्प नगरी येथे २, तर थॉमस कॉलनी येथे एक अशा एकूण 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. कोरोना उपचारातून बरे झालेल्या 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
आजपर्यंत हद्दीत एकूण 1215 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे.
कोरोनातून बरे झालेल्या 18 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण 1116 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 45 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 11 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या 67ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 10 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 33 इतकी झाली आहे.