Pune : फ्लेक्स काढण्यासाठी वीजखांबावर चढल्याने विजेचा धक्का बसून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
एमपीसी न्यूज -फ्लेक्स काढण्यासाठी वीजखांबावर चढल्यामुळे धक्का बसल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.ही घटना वडगाव शेरी येथे घडली.
अंकुश खंडू बनसोडे याचा या अपघतात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क बसथांब्यानजिक लावलेला एक फ्लेक्स (Pune) काढण्यासाठी अंकुश रोहित्राच्या वीज खांबावर चढल्याने 11 केव्ही वाहिनीचा धक्का त्याला बसला व तो गंभीर जखमी झाला.
रविवारी उपचारादरम्यान त्याचा (दि. 16 ) दुर्दैवी मृत्यू झाला.
या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाने त्याचवेळी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे.
त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार (Pune) आहे.