Bhosari : भोसरीमध्ये बर्निंग कारचा थरार
एमपीसी न्यूज – चालत्या कारने पेट घेतल्याने भोसरीत बर्निंग (Bhosari) कारचा थरार घडला. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी भोसरी येथे घडली.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फिरोसिया कंपनी चौक, भोसरी एमआयडीसी येथे एका कारने पेट घेतल्याची माहिती दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास गणेश साळे यांनी अग्निशमन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी येथील मुख्यालयातून एक बंब घटनास्थळी रवाना झाला.
दरम्यान, नागरिकांनी कारला लागलेली आग विझवली होती. (Bhosari) अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पूर्ण विझली असल्याची खात्री केली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.