Pune : राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार : महादेव जानकर

एमपीसी न्यूज – राज्यात आज भाजपने मित्रपक्ष फोडले. पण काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी पण छोट्या पक्षांना खाण्याचच काम केलं. ज्यांना आम्ही सत्तेत बसवलं त्यानां खाली खेचायची ताकद देखील आमच्यात आहे.स्वतःच घर मजबूत करा अन् रासपचं सरकार आणा,असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुण्यातील (Pune) मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.

Bhosari : भोसरीमध्ये बर्निंग कारचा थरार

राष्ट्रीय समाज पक्षाचा 20 वा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष एस एल अक्की सागर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने,पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजित पाटील, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष गणेश लोंढे, जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर यांच्यासह रासाप चे दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिनाडू, गुजरात, राजस्थान सह देशभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महादेव जानकर म्हणाले की, या क्षणाला राष्ट्रीय समाज पक्ष मोठा कसा करायचा आणि रासपची दिल्ली आणि राज्यात शासन कसं येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वीस वर्षाच्या कार्यकाळात रासपने 4 आमदार, 95 जिल्हा परिषद सदस्य, बेंगलोर, आसाम गुजरातमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. टप्पा टप्प्याने आमची प्रगती चालू आहे. त्यामुळे आम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील 543 जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत,त्यापैकी मिर्झापूर (उत्तर प्रदेश), परभणी, माढा, बारामती यापैकी एका ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.