Sangvi : पिंपळे गुरव येथे घराला आग

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव (Sangvi) येथील राजीव गांधी झोपडपट्टी येथे एका घराला आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 29) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

Pcmc : दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत बँक शिबिराचे आयोजन

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथील राजीव गांधी झोपडपट्टीतील एका घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार रहाटणी, थेरगाव आणि पिंपरी येथील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी रवाना झाले.

घराला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. जवानांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.