Moshi : भांडणात दोघांवर घरगुती चाकूने वार; आरोपी विरोधात गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – मोशी येथे भांडणामध्ये दोघांवर चाकूने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि.23) रात्री (Moshi) घडली. याप्रकरणी बाळासाहेब पिराजी शिंदे (वय 23, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून भैय्यासाहेब रघुनाथ वाघमारे (वय 37, रा. मोशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी हा फिर्यादी यांच्या मावशीला मारहाण करत होता. ही घटना बघून फिर्यादी त्यांचे आई, वडील व मामा हे भांडण सोडवण्यासाठी तिथे गेले. यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मामाला शिवीगाळ करत मध्ये पडायचे नाही असे सांगितले.
Alandi : आळंदी येथे शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने नवदुर्गा पुरस्काराचे आयोजन
यावेळी फिर्यादीच्या मामाने त्याला उत्तर दिले असता त्याचा राग येऊन आरोपी यांनी घरातील चाकू आणत फिर्यादींचे मामा (Moshi ) यांच्यावर वार केले. भांडणे सोडवण्यासाठी फिर्यदी पडले असता फिर्यादी यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार करत जखमी केले.
यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.