Alandi : आळंदी येथे शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने नवदुर्गा पुरस्काराचे आयोजन

एमपीसी न्यूज : आळंदी येथे शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने (Alandi) नवदुर्गा पुरस्कार -2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा वेळी देवस्थानचे माजी विश्वस्त अभय टिळक, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुरेश वडगांवकर, प्रमुख पाहुणे आनंद पिंपळकर( प्रसिद्ध वास्तूतज्ञ) हे उपस्थित होते.

 

समाजातील कर्तृत्ववान व प्रतिकुल परिस्थितीत नेत्र दीपक कार्य करणाऱ्या निवडक माता भगिनींना या मान्यवरांच्या शुभ हस्ते नवदुर्गा पुरस्कार -2023 चे सन्मान पत्र व सन्मान चिन्ह मंडळाच्या वतीने देण्यात आले.

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसऱ्याच्या शुभेच्छा

यामध्ये राजकीय क्षेत्रात पुष्पाताई कुऱ्हाडे, रुपाली पानसरे ,अनिता झुजम, शैक्षणिक क्षेत्रात भारतीताई रंधवे, विद्या उगले,वैद्यकीय क्षेत्रात मोनिका भेगडे सामाजिक क्षेत्रात सायली धनाबाई,कमल थोरात,नयना पुरंदरे, नेहा शेळके, कला क्षेत्रात पूर्वा सांडभोर प्रशासकीय क्षेत्रात नयना कामथे, विद्या माने सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रवीर संघ आळंदी शाखा यांना हा पुरस्कार यावेळी देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवीर संघाने मर्दानी खेळ सादर केला. तसेच यावेळी (Alandi) शिवतेज गणेश मंडळाने 2022-2023 चा वार्षिक अहवाल येथे सादर करण्यात आला.

यावेळी शिवतेज मंडळाचे आनंदराव मुंगसे,मंगेश तिताडे,राहुल गोरे देवस्थान व्यस्थापक ज्ञानेश्वर वीर व मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.