Pimpri : कोयत्याचा धाक दाखवून व्यवसायिकाला लुटले

एमपीसी न्यूज- घरी जाणाऱ्या व्यावसायिकाला रस्त्यात शस्त्राचा धाक दाखवून लुटले आहे . ही घटना खरळवाडी येथे सोमवारी (दि.23) घडली.

याप्रकरणी इरशाद जाकीर कुरेशी (वय 32, रा खराळवाडी पिंपरी ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी हंजाला कुरेशी, अल्ताफ शेख , सैफ सय्यद, साहिल अत्तार, फैजान माजीद खान, समीर वाघमारे या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे .

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसऱ्याच्या शुभेच्छा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून घराकडे जात होते यावेळी आरोपींनी त्यांना अडवून धारदार कोयत्याचा धाक दाखवून व लाथा बुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच फिर्यादी यांच्या खिशातील सहाशे रुपये जबरदस्ती काढून घेत आरोपी तिथून पळून गेले. या घटनेवरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.