Khed : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव (Khed )वाहनाने धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 25) रात्री पावणे नऊ वाजता खेड तालुक्यातील कोरेगाव फाटा ते कोरेगाव मार्गावर घडली.
काळूराम गजानन मेंगळे (वय 40, रा. कोरेगाव, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या (Khed) व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अनिल शेळके यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Chinchwad : चिंचवड येथील आरएमसी प्लांटला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा दणका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळूराम मेंगळे हे कोरेगाव फाटा येथून कोरेगाव येथे पायी चालत जात असताना त्यांना भरधाव आलेल्या एका वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.