Pimpri : पिंपरीमध्ये मराठा आंदोलन कार्यकर्त्यांची धरपकड; कार्यकर्त्यांकडून ‘अंबादास दानवे गो बॅक’च्या घोषणा

एमपीसी न्यूज :  पिंपरीमध्ये मराठा आंदोलन कार्यकर्त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून (Pimpri ) ताब्यात घेण्यात आले आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पाहणी दौऱ्यासाठी आले असता त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना धरपकड केली. 

यावेळी अंबादास दानवे गो बॅकच्या घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणाही देण्यात आल्या.

Chinchwad : चिंचवड येथील आरएमसी प्लांटला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा दणका

दिवसेंदिवस राज्यातील मराठा आंदोलन तीव्र होत चालले असून गावागावात आमदार, खासदारांचे रस्ते अडवले जात असून (Pimpri ) काही गावात देखील नेत्यांना बंदी करण्यात आली आहे.  यामुळे आता सरकारवर मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची वेळ आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.