Chinchwad : चिंचवड येथील आरएमसी प्लांटला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा दणका

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील एम्पायर इस्टेट जवळ सुरु असलेल्या बांधकाम साईटवर आरएमसी प्लांट सुरु केला (Chinchwad) जात आहे. या प्लांट मधून उडणाऱ्या धुळीमुळे एम्पायर इस्टेट येथे राहणाऱ्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार केली. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आरएमसी प्लांटला भेट देऊन संबंधितांना 15 दिवसात महामंडळाने सांगितलेल्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चिंचवड येथील एम्पायर इस्टेट या सोसायटीमध्ये अडीच हजार सदनिका आणि 200 दुकाने आहेत. या परिसरात सुमारे सहा हजार नागरिक वास्तव्य करतात. याच सोसायटीच्या शेजारी रुणवाल बिल्डर्स यांची एक बांधकाम साईट सुरु आहे. त्या साईटवर काम करण्यासाठी तिथे आरएमसी प्लांटची उभारली केली जात आहे.

या प्लांटमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्लांटचे काम पूर्ण झाल्यास यातून उडणारी धूळ नागरिकांच्या अन्न पाण्यात मिसळून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर देखील याचा दुष्परिणाम होऊ शकतो. हा परिसर रहिवासी झोन असून इथे आरएमसी प्लांट उभारण्याची परवानगी नाही, असे असतानाही प्लांट उभारला जात आहे.

Pimpri : पिंपरीमध्ये मराठा आंदोलन कार्यकर्त्यांची धरपकड; कार्यकर्त्यांकडून ‘अंबादास दानवे गो बॅक’च्या घोषणा

याबाबत संबंधितांना कल्पना देऊन देखील त्यांच्याकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम (Chinchwad) व्यावसायिक यांना योग्य ती समज देऊन प्लांटचे काम बंद करावे, अशी मागणी नाईक यांनी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील निवेदन दिले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने आता या आरएमसी प्लांटला निर्देश दिले आहेत. प्लांटच्या बाजूला 15 दिवसात 20 फूट उंचीची भिंत उभारावी. प्लांटमधून उडणारी धूळ रोखण्यासाठी 15 दिवसात पाण्याचे स्प्रिंकलर ऐवजी फॉगिंग सिस्टिम बसवावी. तसेच महामंडळाकडून पडताळणी होईपर्यंत प्लांट सुरु करू नये, असे निर्देश आरएमसी प्लांट उभारणाऱ्या अष्टेक इंडिया प्रा ली या कंपनीला दिले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.