Bhosari : हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करत लुबाडले, तीन आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज- कामगारांचे पीएफचे पैसे का भरले नाहीत असे विचारण्यात केल्यानंतर (Bhosari) चार जणांनी एका हॉटेल व्यवसायिकाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व महागडा फोन असा तब्बल एक लाख 90 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्ती लुबाडून नेला आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री पंचरत्न रीजन्सी हॉटेल भोसरी येथे घडली.

शिवराज सुदाम लांडगे वय 36 राम भोसरी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस (Bhosari)ठाण्यात या प्रकरणी फिर्यादी दिली आहे फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आतापर्यंत दिनेश गोपाळ शेट्टी वय 53 कात्रज नितेश दिनेश शेट्टी व 21 सुदर्शन सिताराम शेट्टी वय 33 राबोसरे या तिघांना अटक केली असून त्यांच्या सोबत असणाऱ्या एका वेटरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune RTO : दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका; दुचाकीचा क्रमांक चारचाकीसाठी पाहिजे असेल तर करावा लागेल अर्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दिनेश याच्याकडे हॉटेलमधील कामगारांचे पीएफचे पैसे का भरले नाहीत याचे विचारणा करण्यासाठी केले होते यावेळी आरोपीने त्याच्या इतर साथीदारांसह फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीला चोपर चा भाग दाखवून त्यांच्या गळ्यातील चाळीसगाव वजनाची एक लाख वीस हजार रुपयांची सोन्याची चैन काढून घेतली तसेच खिशातील 70 हजार रुपयांचा फोन देखील काढून घेण्यात आला यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मारहाण व एक लाख 90 हजार रुपयांचा आवाज लुगडल्याचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एमआयडीसी भोसरी पोलिसाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.