Khed : खालुंब्रे येथे तरुणाकडून तब्बल 9 लाख रुपयांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत खेड तालुक्यातील (Khed) खालुंब्रे या गावात एका तरुणा कडून तब्ब्ल 9 लाख 2 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.हि कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.26) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली.

मोहीत महेंद्र आगळे (वय 25 रा.तळेगाव दाभाडे) असे अटक (Khed)आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचे साथीदार काजल जावेद खान व नंदा विलास बोत्रे यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रणधीर माने यांनी फिर्याद दिली आहे.

Bhosari : हत्यार घेऊन दमदाटी व धमकी देत टोळक्याचा धुमाकूळ, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून मोहित याला खालुंब्रे येथे कैलास व विलास धोत्रे यांच्या चाळी जवळून ताब्यात घेतले. यावेली त्याच्या कडे 8 किलो 713 ग्रॅम वजानाचा गांजा व तीन मोबाईल फोन असे एकूण 9 लाख 2 हजार 300 रुपयांचा एवज जप्त केला. मोहित हा तेथे गांजा विक्रीसाठी आला होता. मोहित याने हा गांजा ओडीसा येथून एकाकडून विकत घेतला होता. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींवर एन.डी.पी.एस.अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.