Bhosari : हत्यार घेऊन दमदाटी व धमकी देत टोळक्याचा धुमाकूळ, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- पाच ते सहा जणांच्या टोक्याने हातात रोड व हत्यारे घेत (Bhosari) एका नागरिकाच्या घराच्या दरवाजावर लाथा बुक्क्या मारून दमदाटी करून परिसरात दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही घटना भोसरी येथे गुरुवारी रात्री चक्रपाणी वसाहत या परिसरात घडली आहे.

याप्रकरणी बबन महादू सूर्यवंशी (वय 32 रा. भोसरी) यांनी (Bhosari) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून भोसरी पोलिसांनी अनिल जाधव, शुभम उर्फ दाद्या माने, सागर जाधव, विवेक मिडगुले, रामदास आंबीलपुरे, आरो अंबिलपुरे (सर्व रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे हातात लोखंडी रॉड व हत्यारे घेऊन आले.फिर्यादी यांच्या दरवाज्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दमदाटी करून धमकी दिली. परिसरात दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादीनुसार गाडीवर दगड मारून तोडफोड केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.