Pune : षटकार, चौकार, फलंदाज, गोलंदाज यासारखे शब्द सावरकरांनी निर्माण केलेत – मेधा कुलकर्णी
एमपीसी न्यूज -भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत आज एकदिवसीय (Pune ) विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे. या पाश्वभूमीवर भाजप महिला नेत्या मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. क्रिकेटशी निगडीत षटकार, चौकार, फलंदाज, गोलंदाज यासारखे शब्द सावरकरांनी निर्माण केलेत अशी पोस्ट त्यांनी टाकली होती. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत होती.
Moshi : काढा करून न दिल्याने पत्नीला बेदम मारहाण
मेधा कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, क्रिकेट पाहणाऱ्या किती लोकांना माहित आहे कि षटकार, चौकार, फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक , यासारखे क्रिकेटशी संबंधित शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निर्माण केले आहेत आणि मराठी भाषा समृद्ध केली आहे.
परंतू काही वेळातच त्यांनी ही पोस्ट डीलिट देखील (Pune ) केली.