Pune : ओरिगामीचे ‘वंडरफोल्ड’ प्रदर्शन येत्या 23 नोव्हेंबर पासून

एमपीसी न्यूज – इंदुताई टिळक कला केंद्र व ओरिगामी मित्र यांच्या (Pune)वतीने ‘वंडरफोल्ड 2023’ या ओरिगामी कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे दिनांक 23 ते 26 नोव्हेंबर या काळात (Pune)सकाळी 10 ते रात्री 8 या काळात प्रेक्षकांसाठी खुले असेल. या प्रदर्शनाची ही 17 वी आवृत्ती असून हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी भरविण्यात येत असते.

 

Moshi : काढा करून न दिल्याने पत्नीला बेदम मारहाण

परंतु कोरोनामुळे चार वर्षांच्या खंडानंतर हे प्रदर्शन होत आहे, अशी माहिती आयोजन समितीचे सदस्य व ओरिगामी कलाकार मिलिंद केळकर यांनी दिली.

 

कागदाच्या वैशिट्यपूर्ण घड्या घालून विविध प्रतिकृती साकारणारी ओरिगामी ही एक जपानी कला असून या प्रदर्शनात सुमारे 35 ते 40 कलाकारांच्या 350 ते 400 कलाकृती बघण्यास उपलब्ध असतील.

 

त्यामध्ये, सुंदर लँप शेड, प्राणी, फुलं, मानव, विविध वस्तू व आकर्षक डिझाईनच्या छोट्या कागदी प्रतिकृती प्रदर्शित करण्यात येतील. प्रदर्शनाचे उद्घाटन वास्तुविशारद नरेंद्र डेंगळे व शिल्पकार सतीश घाटपांडे यांच्या हस्ते 23 नोव्हेंबरला सकाळी 10.30 वाजता होईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.