Pune : अविनाश सपकाळ यांनी दिले झोपडपट्टी सदृश्य 70 अभिप्राय; माजी नगरसेवकांचा आरोप
एमपीसी न्यूज – अविनाश सपकाळ यांनी झोपडपट्टी सदृश्य 70 (Pune) अभिप्राय दिल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे. त्यासंबंधीची माहिती एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. अविनाश सपकाळ यांना सकाळपासून आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांचा नंबर हा बंद आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे आणि संजय बालगुडे यांनी दिली. त्यासंदर्भातील निवेदन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना आज देण्यात आले.
पुणे महापालिकेच्या अविनाश सपकाळ यांनी मी फक्त तीन अभिप्राय दिले आहेत, बाकीचे अभिप्राय हे अन्य उपायुक्त यांनी दिले आहेत, असे या नगरसेवकांना उत्तर दिले. ही बाब गंभीर आहे. आयुक्त यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडून सर्व अभिप्राय मागून घेऊन ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे अभिप्राय दिले आहेत, त्या सर्व अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्याकडून सदरचा चार्ज काढून घ्यावा, अशी मागणीही या करण्यात आली आहे.
सपकाळ यांनी दिलेले सर्व (झोपडपट्टी सदृश्य) अभिप्राय हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून मागवून घ्यावेत. नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आणि कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांची समिती नेमून प्रत्येक अभिप्राय तपासून घ्यावा.
NCP : खेळाडू दत्तक योजनेचा महापालिकेला विसर?
अविनाश सपकाळ यांच्याकडून त्वरित सदर बाबतीतला चार्ज काढून घ्यावा आणि पुणे महानगरपालिकेने हे प्रकरण स्वतःहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करावे. अन्यथा आम्ही तर करणार (Pune) आहोतच परंतु नियोजन प्राधिकरण म्हणून महानगरपालिकेचे नुकसान करणारे अधिकारी महानगरपालिकेच्या सेवेत असता कामा नये, यासाठी वरील अधिकाऱ्यांची तातडीने सेवा निलंबित करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.