Pune : महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत – हर्षदा फरांदे

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत एका युवतीला (Pune) लग्नास नकार दिल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यास पोलिसांनी अटक केली. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने आज पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे हर्षदा फरांदे यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केला गेला, ही घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत हा प्रकार घडला.

Pune : अविनाश सपकाळ यांनी दिले झोपडपट्टी सदृश्य 70 अभिप्राय; माजी नगरसेवकांचा आरोप

या घटना गंभीर असून अशा घटना पुढील काळात घडू नये, याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनात (Pune) करण्यात आले.

महिला मोर्चाच्या शिष्टमंडळात फरांदे यांच्यासह आरती कोंढरे, भावना शेळके, श्यामा जाधव , वैशाली नाईक , अश्विनी पवार , रुपाली कदम, थोरविना येनपुरे, रागिणी खडके, कोमल कुटे, उज्वला गौड, सरस्वती अडगळे आणि प्रेरणा तुळजापूरकर यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.