PCMC : पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती गठित, विभागीय आयुक्त घेणार दोन महिन्याला आढावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा प्रश्न (PCMC) सोडविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव दर दोन महिन्याला त्याबाबतचा आढावा घेणार आहेत.

शहरातील हौसिंग सौसायटी फेडरेशनने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील झालेल्या सुनावणीमध्ये पुणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा समस्यांबाबत समिती गठीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

त्यानुसार विभागीय आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महापालिका आयुक्त शेखर सिंह, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांचा समावेश आहे.

Pune : महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत – हर्षदा फरांदे

या समितीने दोन महिन्यातून एकदा बैठक घेऊन शहरातील पाणी कमतरता, तूट, पाणी टँकर सुविधाबाबत आढावा घ्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पुण्यात बैठक झाली.

या बैठकीला आयुक्त सिंह, मुख्य अभियंता सवणे, कार्यकारी (PCMC) अभियंता अजय सुर्यवंशी, रामनाथ टकले आदी अधिकारी उपस्थित होते. शहरातील ज्या भागात पाण्याच्या तक्रारी आहेत, त्या भागाची पाहणी करून पाणी प्रश्न सोडवा, असा आदेश विभागीय आयुक्त राव यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.